जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळकेवाडी ता. पाटण
पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीचा उंच सखल
पठारांनी व्यापलेला आहे . यापैकीच पाटण जि . सातारा येथील एक प्रसिध्द पठार
म्हणजेच 'वाल्मिकी पठार' होय .
या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पठारावर वाल्मिकी मंदिराच्या ईशान्य दिशेला १५ किमी. अंतरावर मौजे कळकेवाडी हे मोजकी वस्ती असलेले पण स्वयंपूर्ण खेडेगाव वसलेले आहे . या खेडेगावातील १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जि . प . प्राथमिक शाळा कळकेवाडी हे विद्यामंदिर इ . स. १९६१ पासून अस्तित्वात आले . निसर्गरम्य ,आल्हाददायक वातावरणात या वस्तीत मुले इ . १ ली पासून ८ वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. व आपल्या भविष्याचा पाऊलखुणा शोधण्याचा एक उत्तम प्रवास करत आहे
No comments:
Post a Comment
a